अर्थ : एखाद्या गोष्टीचे अंग वा अंश गळून किंवा तुटून पडणे.
उदाहरणे :
जोरदार वार्यामुळे आंब्याचा मोहोर झडला
समानार्थी : झडणे
अर्थ : छिद्रातून पाझरणे वा ठिबकणे.
उदाहरणे :
पिशवी फाटल्यामुळे दूध गळाले.
अर्थ : त्राण नाहीसे होणे.
उदाहरणे :
तापामुळे ती अगदीच गळाली
अर्थ : निवड न होणे.
उदाहरणे :
त्याचे नाव यादीतून गळले.
अर्थ : गळून पडण्याची क्रिया.
उदाहरणे :
शिशिरात झाडाच्या पानांना झड लागते.
केसांचे गळणे थांबविण्यासाठी तो कित्येक प्रकारच्या औषधांचा वापर करतो
समानार्थी : झड
गळणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. galne samanarthi shabd in Marathi.